वीजबिल Sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्राहकांनो, आता पाच हजारांपेक्षा जास्त वीजबिलासाठी द्या धनादेश !

ग्राहकांनो, आता पाच हजारांपेक्षा जास्त वीजबिलासाठी द्या धनादेश! 1 नोव्हेंबरपासून नियम लागू

विजय थोरात

पूर्वी दोन लाखांपर्यंत वीजबिलाची रक्कम रोकड स्वीकारली जात होती. मात्र आता पाच हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल रोकड नव्हे तर चेकने भरावं लागणार आहे.

सोलापूर : वीज नियामक आयोगाने (Electricity Regulatory Commission) आता वीज ग्राहकांसाठी नवीन निर्णय लागू केला आहे. पूर्वी दोन लाखांपर्यंत वीजबिलाची (Electricity bill) रक्कम रोकड स्वीकारली जात होती. मात्र आता पाच हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल असल्यास रोकड नव्हे तर ग्राहकांना चेकने (धनादेश) बिल भरणा करावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) मार्फत 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या वीज नियामक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे महावितरणची थकीत बिलाची रक्कम वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यापूर्वी रोखीने बिल भरण्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत होती. आता रोखीने वीजबिल भरण्यावर नियंत्रण आले आहे. आयोगाने महावितरणच्या सर्व विभागांना नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महावितरणकडून रोख पैशाऐवजी ऑनलाइन, डीडी अथवा धनादेशाला महत्त्व देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून जास्तीत जास्त ऑनलाइन सेवेला चालना मिळावी यासह गैरमार्गाने मिळवलेला पैसा थकीत वीजबिलाच्या स्वरूपात भरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करून याची नोंद राहावी यासह रोखीने जास्तीचे बिल भरणा करणारे कोण आहेत, अशा ग्राहकांची माहिती मिळावी यासाठी वीज नियामक आयोगाने 24 फेब्रुवारी रोजी वीजबिल रोखीने भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा पाच हजार रुपये केली. 1 एप्रिल 2021 पासून याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. मात्र महावितरणकडून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पाच हजार रुपयांच्यावर रोख वीजबिल भरता येणार नाही. तसेच महावितरणकडूनही ते वीजबिल स्वीकारले जाणार नाहीत. 5000 रुपयांवरील वीजबिल भरणा करण्यासाठी ऑनलाइन सेवा किंवा धनादेशाचा वापर करावा लागणार आहे. हा निर्णय ग्राहकांबरोबरच महावितरणच्या वसुली पथक, अकाउंट खात्यासाठीही डोकेदुखी ठरणार आहे.

ग्राहकांना या अडचणी येणार

ग्राहकांकडे वसुलीसाठी गेलेल्या पथकाला आता रोख पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम स्वीकारता येणार नाही. सोलापूर परिमंडळातील 10 लाख 78 हजार ग्राहकांपैकी साडेतीन लाख ग्राहक ऑनलाइन सेवेचा वापर करतात. ग्राहकांसाठी महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन पद्धतीने विनामार्यादा वीज देयकांचा भरणा करण्यासाठी सोय करून दिली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील एकूण ग्राहक : 10 लाख 78 हजार

  • ऑनलाईन वीजबिल भरणारे ग्राहक : 3.5 लाख ग्राहक

  • जिल्ह्यातील एकूण कर्मचारी : 3 हजार

  • जिल्ह्यातील एकूण सबस्टेशन्स : 261

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून पाच हजाराहून अधिक विज बिलासाठी ग्राहकांना धनादेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांसाठी महावितरणकडून ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT