obc reservation obc reservation
महाराष्ट्र बातम्या

OBC Reservation: राज्यपालांच्या भुमिकेकडे महाआघाडीचं लक्षं

कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला या निर्णयाचा मोठा फटका बसला. यासंदर्भात विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं. सध्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session 2022) दुसरा आठवडा सुरू होत आहे. या अधिवेशनात मविआ सरकार मध्य प्रदेशप्रमाणे राज्यातही ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) कायदा आणणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. आता यावर कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महविकास आघडी सरकारनं नऊ मार्चला याविषयी निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. त्याला राज्यपाल मंजुरी देणार का याकडेही महाआघाडीचं लक्ष लागलं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन कायदा करणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे.

दरम्यान, आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला होता. पुढच्या आदेशापर्यंत निवडणुकीत ओबीसींना राजकीय (OBC Reservation) आरक्षण नसेल, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यामुळे यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आता मात्र राज्यपाल कोणता निर्णय देणार यावर राज्यसरकराचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT