छगन भुजबळ इसकाळ
महाराष्ट्र बातम्या

एकमेकांवर चिखलफेक करणं बंद करा; भुजबळ सभागृहात भडकले

अहवालाबाबत पंधरा दिवसात जी माहिती होती ती दिलीये - छगन भुजबळ

सकाळ डिजिटल टीम

कालपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत वादळी ठरला होता. आज दुसऱ्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात ओबीसी आरक्षणावरून टोलेबाजी सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सत्ताधारी नेत्यांना धारवेर धरलं आहे. दरम्यान, या प्रकरणात चिखलफेक करून काही मिळणार नाही, यासाठी राजकारण न करता एकमेकांना साथ देत तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, ओबीसीच्या पाठिमागे आपण उभे आहात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळेच ओबीसींना वाचवा अशी टोपी मी घातली आहे. आमच्याकडे जे काही उपलब्ध होतं ते आम्ही १५ दिवसांत दिल्या. तुम्ही ७ वर्षांत ओबीसी आरक्षण का वाचवलं नाही? विकास गवळी कोणामुळं उभे राहतात? असं म्हणत छगन भुजबळ (Chhgan Bhujabal) आक्रमक झाले. एकमेकांची उणी-धुणी काढण्यापेक्षा आपण चर्चा करू, असंही छगन भुजबळ म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) पंधरा दिवसात जी माहिती होती ती दिली आहे. आरक्षण शिवाय निवडणूक नको असा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. याला तुमचा पाठिंबा आहे हे चांगले चित्र आहे. विरोधकांनी सही नसल्याचा आरोप केला आहे मात्र तसे नसून त्यावर सही आहेत. १५ दिवसांचा दिलेला वेळ अुपरा होता. न्यायालयात जाणाऱ्या गवळींना कुणाकडून फंडिंग होतंय, असा सवाल ही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT