OBC Reservation Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल ४ फेब्रुवारीला करणार सरकारकडे सुपूर्द

इम्पिरिकल डेटा उपलब्ध होण्यास होणार विलंब पाहता आगामी निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाबाबत हा अंतरिम अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला डेटा उपलब्ध करून दिला होता. त्याचा आयोगाकडून विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला असून, अंतरिम अहवाल येत्या चार फेब्रुवारीला राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे. इम्पिरिकल डेटा (Empirical Data) उपलब्ध होण्यास होणार विलंब पाहता आगामी निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाबाबत हा अंतरिम अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(OBC reservation Updates)

या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने त्यांच्या विविध विभागाकडील ओबीसी व्हीजेएनटीबाबत उपलब्ध अधिकृत डेटा मागासवर्ग आयोगाला सुपूर्द केला होता. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि अन्य विभागांकडून हा डेटा प्राप्त झाला होता.

त्यावर पुण्यात शुक्रवारी (ता. २८) आयोजित बैठकीत आयोगाच्या सदस्यांनी तयार केलेल्या अंतरिम अहवालाबाबत चर्चा झाली. चार फेब्रुवारीला अंतरिम अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे. बैठकीस मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य या वेळी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. परंतु कमी कालावधीत तो उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडील माहितीच्या आधारे मागासवर्ग आयोगाने अहवाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने हा डेटा सर्वोच्च न्यायालयामध्ये यापूर्वीच दिला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडील उपलब्ध माहितीच्या आधारे मागासवर्ग आयोगाने अभ्यास करून अंतरिम अहवाल सादर करावा, असे सुचविले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने या अंतरिम अहवालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT