Devendra fadanvis Team esakal
महाराष्ट्र बातम्या

इम्पेरिकल डेटा राज्य मागासवर्गीय आयोगाने जमा करावा - फडणवीस

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत अशी आपली भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू करत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. याबाबत बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका मांडली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा मिळवून ओबीसींच्या जागा वाचवता येतील. ओबीसींच्या साडेचार हजार जागा वाचू शकतील अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली. आता तात्काळ इम्पिरिकल डेटा जमा करण्याबाबतचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाला द्यावेत. तीन ते चार महिन्यात हा इम्पेरिकल डेटाचे काम पूर्ण करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत अशी आमची भूमिका आहे. ज्या जिल्ह्यांवर जास्त परिणाम होतोय त्यासाठी वेगळा विचार करावा. बैठकीत जी काही चर्चा झाली ती सकारात्मक होती. जवळपास सर्वांचे एकमत होते पण यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान, परप्रांतिय ओबीसींचीही राज्यात ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. या मागणीचे कॅबिनेट मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही स्वागत केले आहे. परप्रांतीय ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) देण्याचा प्रस्ताव तयार करणार असून तो केंद्राकडे पाठवण्यात येईल असं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. ठाकरे सरकार परप्रांतियांना ओबीसी आरक्षण देणार का असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसने त्यांची सत्ता असताना केलं नाही, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे राजकारण करण्यासाठी आता हे केलं जात आहे अशा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT