Student Sakal
महाराष्ट्र बातम्या

परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना धक्का; फ्री शीप योजना रद्द

परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द केला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची फ्री शीप योजना राज्य सरकारकडू बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. ओबीसी बहुजन कल्याण विभागाने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.

(Freeship Scheme Cancelled by State Government)

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसोबत फ्री शीप योजना सुरू केली होती. त्यामध्ये परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च, परिक्षेचा खर्च देण्यात येत होता. १ लाख ते ८ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ घेता येत होता पण शिंदे सरकारने फ्री शीप योजना रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे OBC समाजातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

केंद्र सरकारकडून ज्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न हे एका लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने OBC समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. त्यानंतर हा निर्णय शिंदे सरकाकडून रद्द करण्यात आला आहे.

"यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना संपर्क करून परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेऊ नका असं सांगितलं आहे पण आता काय बोलणार? आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत." असं माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT