Rashmi Thackery  
महाराष्ट्र बातम्या

रश्मी ठाकरेंबद्दलच्या आक्षेपार्ह ट्‌विटबद्दल गुन्हा; भाजपच्या पदाधिकाऱ्याची माफी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजपच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी जितेन गजरिया याच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गजारिया यांची ८ तास चौकशी केली. त्यानंतर आता जितेन गजारिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या ट्विटबद्दल पोलिसांकडे माफी मागितली आहे.

गजारिया यांच्या माफीनाम्यात त्यांनी ट्विट करताना भाषेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही भाषा महिलांना आक्षेपार्ह आहे, त्यामुळे मी माफी मागतो. ही भाषा असभ्य आणि अपमानास्पद असल्यामुळे मी हे ट्विट डिलीट करत आहे आणि भविष्यात मी अशी भाषा वापरणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

शिवसेनेचे शहर उपसंघटक उमेश वाघ (वय 53, रा. गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली होती. शिवसेनाप्रमुख गजानन थरकुडे यांच्या सुचनेनुसार, वाघ यांनी गुरुवारी दुपारी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गजरियाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गजरिया हा भाजपच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी आहे. त्याने 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक ट्‌विट केले होते.

गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह ट्‌विट करुन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले होते. त्याचबरोबर त्याने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कॉंग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांविरुद्ध बदनामीकारक मजकुर ट्‌विटरवर प्रसिद्ध केला होता. तेवढ्यावरच न थांबता त्याने जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीचे ट्‌विट केले आहे. गजरिया हा त्याच्या ट्‌विटमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून द्वेष निर्माण करीत असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT