Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांच्या घरी 'सरकारी पाहुणे' येणार? स्वत: दिली माहिती

मलिकांच्या ताज्या ट्विटमुळं चर्चांना उधाण

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : 'उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत', अस सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केलं आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मलिकांच्या या ट्विटमुळं वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या घरी भेट देणारे पाहुणे म्हणजे नक्की कोण असतील याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हे अधिकृत पाहुणे म्हणजे ईडी (ED) किंवा सीबीआयचे (CBI) अधिकारी तर नसतील ना? अशाही चर्चा रंगल्या आहेत. पण या पाहुण्यांनी घरी भेट दिलीच तर त्यांचे मी स्वागत करेन असंही मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणालेत नवाब मलिक?

नवाब मलिकांनी काही वेळापूर्वी इंग्रजीत एक ट्विट केलं. यामध्ये ते म्हणतात, "माझ्या माहितीप्रमाणं काही अधिकृत पाहुणे उद्या सकाळी सकाळी माझ्या घरी भेट देणार आहेत. पण मी त्यांच्या स्वागतासाठी चहा आणि बिस्किटांसह तयार असेल. जर त्यांना माझ्या योग्य पत्ता हवा असेल तर त्यांनी मला फोन करावा"

नवाब मलिक हे राज्याचे मंत्री असून राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते आहेत. त्यांनी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावरुन रान उठवलं होतं. एकामागून एक कथीत पुराव्यांसह त्यांनी वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर आरोपांच्या फैरी सुरु केल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पण हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर कोर्टाच्या सूचनेनुसार सध्या मलिकांनी आरोपांची मालिका थांबवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT