Aditya Thackeray , Devendra Fadnavis and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेची गोची! दसरा मेळाव्यासाठी अधिकारी अर्ज स्वीकारत नाहीये : आदित्य ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या वार्षिक दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठीचे अर्ज अधिकारी स्वीकारत नसल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्कवर शिवसेना अनेक दशकांपासून दसरा मेळावा घेत आहे. (aaditya Thackeray news in Marathi)

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज भाषणांसाठी हा मेळावा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या शिवसेनेच्या दोन गटांनी मेळाव्यासाठी परवानगी मागितल्याबद्दल आदित्य यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, "शिवसेना मुंबईत वार्षिक दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मागत आहे, पण अधिकारी आमचा अर्ज स्वीकारत नाहीत. हे (एकनाथ शिंदे गट) दडपशाहीचे सरकार आहे.

ते म्हणाले की, 'शिवसंवाद यात्रेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील जनतेने पाहिलंय की शिंदे सरकार खोके सरकार आहे. (एक खोके म्हणजे 1 कोटी रुपये) जनता या 'देशद्रोह्यांच्या' पाठीशी नसून तर शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे, असा दावा आदित्य यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

Pune Accident : लुटमार, मदतीचा हात अन् काळाचा घाला! शिरूर बायपासवर महिलेचा दुर्दैवी अंत, एका रात्रीत दोन संकटांचा सामना, काय घडलं..

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Dombivli Politics: निवडणुकीत विरोधक, विकासकामात एकत्र; म्हात्रे कुटुंबाच्या व्यासपीठावरील भेटीने डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ

MD Drugs: पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्जसाठी गुंडांची हातमिळवणी! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तयार झाली अभेद्य साखळी

SCROLL FOR NEXT