Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: सावरकर ठरतायत अडचणीचे, ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडच्या नव्या युतीत जुने मतभेद कायम

पहिल्याच मेळाव्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांच्या भूमिकेवरून मतभेद

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली. परंतु युतीमद्धे जुनेच मतभेद अजूनही खोडा घालत आहेत. याचा प्रत्यय काल नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांवरून मतभेद दिसून आले आहेत.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील युतीनंतर काल नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पहिल्याच मेळाव्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांच्या भूमिकेवरून मतभेद दिसून आले आहेत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्याच व्यासपीठावरून ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यां खडसावत चांगलेच कान टोचले आहेत.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आपल्या भाषणामध्ये स्वा. सावरकर यांच्यावर टीका केली. भाषणामध्ये स्वा. सावरकर यांच्यावर टीका करतांनाच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाचा संदर्भ दिला. यामध्ये आंबेडकरांनी सावरकरांवर टीका करताना सावरकरांचा तोंडातून नरक बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा संदर्भ दिला. त्यांच्या याच विधानावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला आहे.

भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, तुमची आमची युती असली तरीही बोलण्याचे भान ठेवा या शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना सुनावले आहे. सावरकर हे मोठेच होते, पण त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, बाबासाहेब आंबेडकर काय बोलले तो त्यांचा अधिकार होता आपला नाही ही माणसं त्यात्या वेळी मोठीचं होती. तुमचे मत असले तरीही जेव्हा एका व्यासपीठावर एकत्र येतो. तेव्हा भान ठेवा. तुम्ही आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नका आम्ही करणार नाही. माझी उध्दव साहेबांकडे तक्रार केली तरी चालेल पण असे बोलू नका असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT