Employees Strike Sakal
महाराष्ट्र बातम्या

State Employee Strike : कर्मचारी संपाबाबत मोठी अपडेट; जुन्या पेन्शनचा मुद्दा आता हायकोर्टात

राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत.

(Old Pension Scheme employee Strike Bombay High Court Gunratna Sadavarte )

जुन्या पेन्शनसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप सुरु आहे. आज संपाचा तिसरा दिवस आहे. आता जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात गेला आहे.

विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने जरी अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो समन्वय समितीला मान्य नाही.

तर दुसरीकडे संपात फुट पडल्याचे निर्दशनास आले आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली आहे.

या फेडरेशनने याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवलं आहे. या संघटनेने १४ आणि १५ मार्च रोजी संपात आपला सहभाग नोंदवला होता.

 आजपासून प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती बांधून काम सुरू राहील, असं फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT