Shivaji Maharaj Controversy Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj Controversy: "...तर मला माझे कपडे विकायला लागतील", आमदार संतोष दानवेंचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड याच दरम्यान नवनवीन वाद समोर येताना दिसत आहेत. अशातच भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही काल शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आणि पुन्हा राजकारण चांगलंच तापलं. त्यानंतर आज सोशल मिडियावर रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र आमदार संतोष रावसाहेब दानवे यांचाही एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र आमदार संतोष रावसाहेब दानवे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला एलईडी लाईट लावायला पैसे मागण्यासाठी गेल्यावर ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर मला माझे कपडे विकायला लागतील असं वक्तव्य संतोष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

व्हिडिओमध्ये पुढे ते म्हणतात की, तुमचे स्थानिक नेते कोण आहेत त्यांना मी सांगतो पैसे द्यायला, मी असे पैसे वाटत नाही. जेव्हा पैसे मागण्यासाठी आलेले लोक त्यांना पैसे देण्यासाठी पुन्हा विचारतात तेव्हा ते चल निघ रे म्हणतात. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लाखों कोटी रुपये खर्च करत असतानाच आमदार शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला एलईडी लाईट लावायला पैसे द्यायला नाकारतो हे पाहून सोशल मिडियावर रोष व्यक्त केला जात आहे.

तर कालच केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र, हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच दानवे यांनी माफी मागितली आहे. अशातच या नव्या वादग्रस्त व्हिडिओमुळे पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु हा व्हिडिओ 2012 सालचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT