Sanjay Shirsat Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat : 'शिवसेना संपेल तेव्हा संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील'

हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांनी सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांनी सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडांचा आरोप केला आहे. विरोधकांच्या या आरोपांवर शिंदे गटाकडून आक्रमकपणे उत्तर दिलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच मुद्दावरून ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांना त्रास दिल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. आता त्यांची सत्ता आहे, त्यांचं काम व्यवस्थित रित्या सुरू आहे म्हणून तुम्ही रिकामे आरोप करत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे. खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ज्या दिवशी शिवसेना संपेल त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT