One crore Sakal Relief Fund to help flood victims 
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे. 

यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा.

सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२

आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.

पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क - 9881099908
मिस्ड कॅाल द्या -  9881099908
फोन - 9881598815
email - Support@sakalrelieffund.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT