Narendra Modi Vs Mahadev Jankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : एक दिवस मी भारताच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होईन; महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास

महिलांना राजकारणात ५० टक्‍के भागीदारी मिळाली पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी काळात पक्षाची भूमिका व वाटचाल कशी असावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

फलटण शहर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करावे, विजय आपलाच आहे, असा आत्मविश्वास व्यक्त करताना कुठल्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होऊ, असा ठाम विश्वास रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

मातोश्री गार्डन मंगल कार्यालय बरड (ता. फलटण) येथे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय शिबिर पार पडले, त्यामध्ये समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन करताना जानकर बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, ज्‍येष्‍ठ पत्रकार अरविंद मेहता, राज्यातील सर्व विभाग व सर्व आघाडीचे विभागाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय कार्यकारिणी सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख, लोकसभा अध्यक्ष उपस्थित होते.

सुमारे १० वर्षांपूर्वी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महिलांना राजकारणात ५० टक्‍के भागीदारी मिळाली पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडली होती, तसेच जी जात या देशामध्ये ज्या प्रमाणात राहते, त्या प्रमाणात त्यांना सर्व क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे, याबाबत ठामपणे मतप्रदर्शन केले असल्याचा यावेळी राजकीय विश्लेषक प्रा. मनोज निगडकर यांनी निदर्शनास आणून दिले व आगामी काळात पक्षाची भूमिका व वाटचाल कशी असावी, यावर मार्गदर्शन केले.

रासप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी सूत्रसंचालन केले. सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सूळ यांनी आभार मानले. दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरात सुमारे शंभर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही दिवस राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांनी शिबिर स्थळी कार्यकर्त्यासोबत जेवण केले आणि मुक्काम केल्याने सर्वांचा उत्साह दुणावल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT