महाराष्ट्र

Raj Strike : 'पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडवला जाईल'

वृत्तसंस्था

मुंबई : दरवेळी निवडणुकांपूर्वी एक हल्ला घडवला जातो. त्यामुळे या निवडणुकीपूर्वीही एक हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडवला जाईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आपल्या जवानांना चुकीची माहिती दिली गेली. त्यांचा ताफा त्या रस्त्याने गेलाच कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेच त्यांनी अजित दोवाल यांच्या मुलाचा व्यावसायिक भागीदार हा पाकिस्तानी आहे, असेही सांगितले. पुढे ते म्हणाले, भाजपच्या भंपक ट्रोलर्सना भीक घालत नाही. जुन्या गोष्टी विसरण्यासाठी नव्या गोष्टी घडवल्या जात आहेत. भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसवले पाहिजे. त्यांना एकदाचा धडा शिकवला पाहिजे. सैनिकांनी त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावले. भाजपकडून मतांसाठी सैन्याचा गैरव्यवहार करण्यात आला.

देशातील गुप्तचर यंत्रणेने सांगूनही काळजी घेतली नाही. मग राष्ट्रीय सल्लागर काय करत असतो. मग प्रश्न कुणाला विचारायचे? पुलवामा हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश नाही. 

शरीफांना केक बाधला का?

25 डिसेंबरला नवाज शरीफांना केक भरवला. त्यानंतर लगेच पठाणकोट येथे हल्ला झाला. केक बाधला का? काय झाले असे?, असे राज ठाकरे म्हणाले. 

...तर अभिनंदन यांना उभं जाळलं असतं

जर आपण त्यांचे 250-300 दहशतवादी मारले असते तर आपल्या देशातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांनी उभं जाळलं असतं.

राफेलच्या सामर्थ्यावर संशय नाही 

राफेलच्या सामर्थ्यावर संशय नाही पण त्याच्या करारावर संशय आहे. राफेल खरेदीचे कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला का दिले? राफेलची कागदपत्रे चोरी होतातच कसे?, असा सवालही त्यांनी केला.

भाजपवाल्यांनी खूप नाटकं केेली

भाजपवाल्यांची खूप नाटकं केली. आता त्यांची नाटकं बस्स झाली.

दरम्यान, 'चौकीदार चोर है'च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

मी प्रकाश आंबेडकर नाही

दोन देतो का, असे करायला मी प्रकाश आंबेडकर नाही. त्यांचे आणि ओवैसी यांचे काय चालले आहे, हे कळतच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT