Onion News esakal
महाराष्ट्र बातम्या

Onion Export News : निर्यातशुल्क वाढीचा व्यापाऱ्यांना फटका! जेएनपीए बंदरात सडला ८०० टन कांदा

रोहित कणसे

राज्यात काही दिवसांपूर्वी कांद्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आणि याचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे.

निर्यातशुल्क वादाचा थेट फटका कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावलं असून व्यापाऱ्यांची हे निर्यात शुल्क भरण्याची तयारी नाहीये. यामुले जेएनपीए बंदर परिसरात निर्यातीसाठी आलेला ८०० टन कांदा सडल्याचे समोर आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झालं आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात समोर आलेल्या रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र या निर्यात शुल्क वाढीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

भारतातून कांदा कुठे निर्यात होतो?

भारतामधून आपले शेजारचे देश बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका या देशांमध्ये भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. निर्यातीमुळे देशात कांद्यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता पाहाता कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान कांद्यावर निर्यात शुल्क वाढवण्यात आल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT