solapur ray nagar houssing project

 

sakal paper

महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या १५०२४ पैकी ५०० बेघर लाभार्थीच गेले घरकुलात रहायला! देशातील सर्वात मोठ्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९००० घरे तयार

रे नगर हा देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचा दुसरा टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील १४ हजार ९७६ घरकुलांपैकी १० हजार १८६ घरांना बांधकाम परवाना मिळाला आहे. त्यातील नऊ हजार घरकुलांची पायाभरणी झाली असून त्यापैकी साडेआठ हजार घरे अंतिम टप्प्यात आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : रे नगर हा देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचा दुसरा टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील १४ हजार ९७६ घरकुलांपैकी १० हजार १८६ घरांना बांधकाम परवाना मिळाला आहे. त्यातील नऊ हजार घरकुलांची पायाभरणी झाली असून त्यापैकी साडेआठ हजार घरे अंतिम टप्प्यात आहेत. डिसेंबअखेर हा टप्पा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार असून तसे नियोजन सुरू आहे.

रे नगर गृह निर्माण प्रकल्पातून सोलापूर शहरातील एकूण ३० हजार बेघर लाभार्थींना हक्काचा निवारा मिळणार आहे. हा प्रकल्प एकूण १५०० कोटी रुपयांचा आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात १५ हजार २४ घरे बांधून त्याचे लोकार्पणही झाले आहे. मात्र, तेथे रोजगाराची सोय नाही, वाहतुकीची अपुरी साधने, शाळा मंजूर आहे पण सुरू झालेली नाही, अंगणवाडीचीही तशीच स्थिती आहे. नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव असून तोही प्रश्न प्रलंबित आहे.

याशिवाय लाभार्थींचे दरमहिन्याचे उत्पन्न आणि बॅंकेचा हप्ता, यात तफावत असल्याने अनेकांनी पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे अवघे ५०० जण तेथे रहायला गेले असून चाव्या घेतलेल्यांपैकी सुमारे तीन हजार लाभार्थी अजूनही तेथे रहायला गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या अडचणी सोडवाव्या लागणार आहेत.

पहिला टप्प्यातील ५०० जणच रहायला

देशातील सर्वात मोठ्या रे नगर गृहप्रकल्पाचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. हातावरील पोट असलेले बेघर लाभार्थी लगेचच ताबा घेऊन त्याठिकाणी रहायला येतील, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, पावणेदोन वर्षे झाल्यानंतरही १५ हजार २४ लाभार्थींपैकी ३४०० लाभार्थींनी ताबा घेतला असून त्यापैकी अवघे ५०० ते ७०० कुटुंबच तेथे रहायला गेले आहेत. रे नगर फेडरेशन लाभार्थींच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT