Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: फक्त अजित पवारच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी; कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पण फक्त अजित पवार हेच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. याबाबत अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पवारांच्या या निर्णयाचं महत्वाही समजावून सांगितलं. (Only Ajit Pawar Supports Sharad Pawar Decision to Resigns from NCP)

अजित पवार म्हणाले, "तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडं पाहून चालली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल"

"शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल"

"अल्पसंख्यकांनीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण ते अध्यक्ष असून किंवा नसू हा आपला परिवार असाच पुढे चालू राहणार नाही. भावनिक होऊ नका. पवार साहेबांनी परवाच सांगितलं की भाकरी फिरवाची असते, असाच त्यांनी निर्णय घेतला आहे. मी काकींशी देखील बोललो आहे तर त्यांनी सांगितलं की अजित ते आपला निर्णय आजिबात मागे घेणार नाहीत. तुम्हाला मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही"

"अध्यक्ष नवीन गोष्टी शिकत जाईल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं, पक्षाच्या मिटिंगमध्ये सहभागी होईल. शेवटी कोणीही अध्यक्ष झालं, प्रदेशाध्यक्ष झालं तरी साहेबांच्या जीवावरच पक्ष चालणार आहे, यावर कोणीही भविष्यवाणी करण्याची गरज नाही," असं सविस्तर भाष्य यावेळी शरद पवारांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT