महाराष्ट्र बातम्या

अतिवृष्टीमुळे CET देऊ न शकलेल्यांना पुन्हा संधी: उदय सामंत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

Mobile Price Hike : शॉकिंग! स्मार्टफोन्सची किंमत होणार डबल; कमी फीचर्स अन् जास्त दर, मोबाईल महागण्याचं नेमकं कारण काय?

3 वर्षे लग्न लपवून ठेवलं अन्…; सैराट फेम अरबाज शेखची हटके लव्हस्टोरी, म्हणाला...'कोर्ट मॅरेज करुन घरच्यांना...'

RBI Action: आरबीआयचा दणका! मुंबईतील 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, कोणत्या ग्राहकांना पूर्ण पैसे मिळणार?

आरोग्यमंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यात चाललंय काय? उपचाराचं बिल मंजुरीसाठी लाच, अधीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT