MPSC_Exams 
महाराष्ट्र बातम्या

पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; आता निवडा तुमच्या पसंतीचं परीक्षा केंद्र!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत नव्याने परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

'एमपीएससी'तर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेद्वारे 217 पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सुरूवातीला ही परीक्षा 17 मार्च रोजी होणार होती, पण कोरोनामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान अर्ज भरताना बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडले होते. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावाकडे गेलेले आहेत, ते पुन्हा या शहरांच्या ठिकाणी येऊन परीक्षा देण्यास तयार नाहीत. तसेच प्रवासात संसर्गाचा धोका आहे. शिवाय, जेवण, निवासाची व्यवस्थाही करावी लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती.

'एमपीएससी'ने 17 सप्टेंबर दुपारी दोन ते 22 सप्टेंबर रात्री 23.59 पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या कायमस्वरूपी पत्त्याच्या जवळचे महसुली विभागाच्या मुख्यालयाच्या केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे परीक्षा केंद्र मिळेल. संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यास आयोगाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या केंद्रावर परीक्षा देणे अनिवार्य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT