opposition boycott parliament inauguration democracy devendra fadnavis politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Parliament Inauguration : संसद उद्‌घाटन कार्यक्रम : विरोधकांचा बहिष्कार लोकशाहीविरोधी; फडणवीसांची टीका

नवीन संसद ही नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. अवघ्या तीन-चार वर्षांत ही वास्तु तयार झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेस आणि जे अन्य विरोधी पक्ष संसदेच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही. संसद ही केवळ एक इमारत नाही तर १४०कोटी देशवासीयांच्या आस्थेचे मंदिर आहे, असे नमूद करतानाच यापूर्वीची अनेक उदाहरणे सांगत त्यावेळी बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन संसद ही नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. अवघ्या तीन-चार वर्षांत ही वास्तु तयार झाली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी कर्नाटक विधानसभेचे भूमिपूजन केले, तेव्हा बहिष्काराचा विषय का आला नाही किंवा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी संसदेच्या ‘अ‍ॅनेक्स’ इमारतीचे तसेच महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्‌घाटन केले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेच्या वाचनालयाचे उद्‌घाटन केले. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बिहार विधानसभेतील सेंट्रल हॉलचे उद्‌घाटन केले, तेव्हा का बहिष्कार आठवला नाही? मणिपूरमधील नवीन विधानसभेचे उद्‌घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री होते.

पण, राज्यपालांना साधे निमंत्रणसुद्धा दिले गेले नाही. आसाम विधानसभेचे भूमिपूजन तरुण गोगोई यांनी केले पण राज्यपालांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. २०१८ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, राज्यपालांना निमंत्रण नव्हते. २०२० मध्ये कुठल्याही संविधानिक पदावर नसताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन केले, मग तेव्हा बहिष्कार का आठवला नाही? असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.

मोदी सरकारचे काम मतदारांपर्यंत पोचवा : फडणवीस

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून अनेक विकासकामे झाली आहेत. ही कामे मतदारांपर्यंत पोचवा विजय नक्की आपलाच आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप, सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हातर्फे संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन आज झाले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

विरोधकांनी जे केले ते लोकशाहीवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उद्‌घाटन करणार असतील तर मग पोटशूळ का? विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. सत्ता आणि खुर्चीच्या लोभाने हे विरोधक एकत्र येतात. विरोधकांकडे नेता, नीती आणि नियत तिन्ही नाही.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT