Abdul Sattar News, Ajit Pawar News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar News: कृषी मंत्रालयातून 15 कोटी वसुलीचे टार्गेट; सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी

सध्याच्या अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दत्ता लवांडे

कृषी मंत्रालयाकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांचे टार्गेट दिले असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधीपक्षांनी विधानसभेमध्ये हे प्रकरण उचलून धरत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटीचे टार्गेट दिल्याची माहिती समोर आली होती.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दरम्यान, "सिल्लोड महोत्सवासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या रक्कमेचे कूपन काढले आहेत. ते कूपन विकण्याचे किंवा खपवण्याचे काम राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं आहे. १० पेक्षा जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे आणि १० पेक्षा कमी तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे टार्गेट देण्यात आलंय.

कूपनमध्येही वेगवेगळ्या कॅटॅगरी आहेत. कृषी दुकानांकडूनही काही बेकायदेशीर रक्कमेची मागणी होत आहे. हे लोकशाहीला धक्का देणारं कृत्य आहे. हे सगळ्या नियमांची पायमल्ली करत असतात. त्यामुळे आम्ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत" असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.(Ajit Pawar News)

काय आहे नेमकं प्रकरण

१ ते १० जानेवारी दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सिल्लोड महोत्सवाचे आयोजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती एका कृषी संचालकाने दिली आहे. तर या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेले कूपन विकण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आल्यामुळे अनेक अधिकारी तणावाखाली आले आहेत.

कसं आहे टार्गेट

आपापल्या विभागातून या महोत्सवात स्टॉल लावणारे वेगवेगळ्या रक्कमेच्या प्रवेशिका आणण्याचे टार्गेट या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० अशा रकमेच्या प्रवेशिकांचा सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT