Maharashtra Government Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "एवढा खर्च राज्य अस्तित्वात आल्यापासून कोणी केला नसेल"; जाहिरातींवरुन दादा पुन्हा बरसले!

१७ कोटीहून अधिक रक्कम जाहिरातीसाठी खर्च झाल्याचं या आधीही अजित पवारांनी सांगितलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या जाहिरातींवरुन विरोधकांनी सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. (Opposition leader Ajit Pawar on Advertising by maharashtra government cm eknath shinde devendra fadnavis)

या नऊ महिन्यात या सरकारने जाहिरातीवर जितका खर्च केल, तेवढा खर्च महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून कोणी केला नसेल, असा दावा अजित पवारांनी विधानसभेत बोलताना केला आहे. जाहिरातीने पूर्ण मुंबई व्यापून टाकलीय, मोठमोठे कटआऊट लावले आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

यापूर्वीही अजित पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते. १७ कोटीहून अधिक रक्कम सरकारने शासकीय जाहिरातींवर खर्च केली आहे, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत बोलताना दिली होती.

अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरही दिलं होतं. या आधी फक्त एकच जाहिरात होती. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढंच आधी होतं. पण आता माझा महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र असं आमचं ब्रीदवाक्य आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT