Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल; अजित पवारांच्या विधानाची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

बंड करून शिवसेनेतून वेगळे झालेले एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या जवळपास दोन अडीच महिन्यांपासून त्यांच्या या बंडाची चर्चा सुरूच आहे. एकीकडे ठाकरेंची शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणवत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच मित्रपक्षात असलेल्या आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे.

एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनताच ठरवेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी काल हे विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेतला एक मोठा गट बाजूला काढला. या घटनेच्या मी खोलात जाणार नाही. लोकशाहीत अशा घटना होतच असतात. ते योग्य की अयोग्य हे सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर महत्त्वाचे मंत्री आणि आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. अखेर या शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Latest Marathi News Live Update : वृद्धाला मारहाण प्रकरणी मनसेचा परप्रांतीय चालकांना दणका

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

Pune News : पुणे महापालिकेसह आरएसएस कार्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; शोधमोहिमेनंतर बॉम्बची अफवा असल्याचे निष्पन्न

SCROLL FOR NEXT