महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve: 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है'

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका

सकाळ डिजिटल टीम

दसऱ्या मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवारी) मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभुमीवर 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है' अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे.

यासंदर्भात बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून जे वेगवेगळे पातशहा येत आहेत, त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आजचा मेळावा बघितला तर बसण्यासाठी जागा नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात गट प्रमुखांनी हजेरी लावली. हा तर फक्त मुंबईचा मेळावा होता अजून महाराष्ट्र येण्याचं बाकी आहे. त्यामुळे 'समझनेवालों को इशारा काफी है' मुंबई ही शिवसेनेची असून, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची असल्याचेही दानवे म्हणालेत.

पुढे बोलताना दानवे म्हणाले कि, मुंबईचा विकास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. यावेळच्या अतिवृष्टीमुळे ठाणे, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात कमरेएवढं पाणी तुंबलं तसंच घरांमध्ये घुसल्याचं पाहायला मिळालं. मात्र यावेळी मुंबईमध्ये पाण्याचा निचरा इतका सुव्यवस्थेत झाला हे एक त्याचं उत्तम उदाहरण असल्याचंही दानवे यांनी यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील नेस्को सभागृहात काल शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजच सांगतो. एक लक्षात घ्या मृत्यूमध्ये फरक कसा असतो. मी गिधाड हा शब्द का वापरला हे लक्षात घ्या. कारण मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी केवळ विकण्यासाठी स्वेअर फुटाची जमीन असेल पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

लढाऊ विमान तेजसचा ब्रेक फेल, धावपट्टीवरून गेलं पुढे; हवाई दलाने घेतला मोठा निर्णय

IND vs SA : वॉशिंग्टन सुंदर अन् डेव्हिड मिलर यांच्यात हाय-व्होल्टेज राडा! अम्पायर, इशान किशन भांडण सोडवायला धावले... Video Viral

Pune News: व्यभिचार सिद्ध करणे ठरतेय आव्हानात्मक; न्यायालयात परिस्थितीजन्य दस्तऐवज, पुराव्यांची साखळी आवश्यक!

Latest Marathi News Live Update : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT