esakal
महाराष्ट्र बातम्या

Opposition Meeting In Bengaluru : मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची बंगळूरमध्ये १७ तारखेला पार पडणार बैठक; शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

Nitish Kumar : गेल्या २३ जूनला पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला देशातील १५ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

New Delhi : मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी विरोधकांची महत्त्वपूर्ण दुसरी बैठक आता बंगळूरमध्ये येत्या १७ व १८ रोजी होणार आहे. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर विरोधी पक्षांची एकता अधिक मजबूत होईल, असा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.  

गेल्या २३ जूनला पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला देशातील १५ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यात दुसऱ्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्याचे ठरले यामुळे बंगळूरच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर या राज्यांमध्ये असलेल्या २७४ जागांच्या वाटपावर विरोधकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

या राज्यांच्या जागा वाटपात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जागा वाटपाच्या संदर्भात काँग्रेस लवचिक राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधील जागांवर काँग्रेसशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत.

‘मोदी वॉशिंग पावडर’

महाराष्ट्रातील राजकारणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘मोदी वॉशिंग पावडर’ने नेत्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप धुतले गेले, अशा आशयाचे ‘ट्विट’ केले आहे.

‘सारे दाग चुटकियों में धुले. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला मंत्री बनण्याची गॅरेंटी,’ असे उपरोधिक लिहून खासदार जयराम रमेश यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बंडावर टिप्पणी केली आहे.

महाराष्ट्राचे बदलते चित्र

या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटणा येथील बैठकीला शरद पवार यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल होते.

आता त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार आहेत. त्यापैकी खासदार सुनील तटकरे यांनी उघडपणे विरोधात भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT