Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: "काँग्रेसची सध्या परिस्थिती..." ; शरद पवारांसमोरच अजित पवारांच्या निर्णयाला विरोध!

Sandip Kapde

Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

शरद पवार यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जयंत पाटील यांनी अश्रू ढाळत पवारांना निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. शरद पवार यांनी नुकतेच असे संकेत दिले होते भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे.

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. कोणीही अध्यक्ष झाले तरी शरद पवारांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी अजित पवार यांनी काँग्रेसचे उदाहरण दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आहेत. पण निर्णय सोनिया गांधी घेतात. त्यामुळे शरद पवार पक्षाचे निर्णय घेतील.

यावर शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार यांच्या विधानाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने विरोध केला. काँग्रेसची सध्या काय परिस्थिती आहे, हे आपल्याला माहित त्यामुळे शरद पवार यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही, असे राष्ट्रवादी नेत्याने अजित पवारांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

SCROLL FOR NEXT