Chitra Wagh 
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : गंगा भगीरथी शब्दाला भाजपमधून विरोध! चित्रा वाघ यांनी सांगितला नवीन शब्द!

Sandip Kapde

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवला आहे. विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हटले पाहिजे, असे लोढा म्हणाले. यासंदर्भात लोढा यांनी प्रधान सचिवांना पत्र देखील लिहिले आहे.

लोढा यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काही सामाजिक व महिला कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील लोढा यांच्यावर टीका केली.

दरम्यान भाजपमधून देखील मंगल प्रभात लोढा यांच्या कल्पनेला विरोधा झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नवीन शब्द सुचवला आहे. तसेच त्यांनी गंगा भागीरथी या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.

"गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती, असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे", असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

विधवा महिलांना समाजात जगण्याचा, नैतिक अधिकार कसा प्राप्त करता येईल, यावर लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची करावी. बाकी आम्ही महिला काय नाव लावायची आणि काय लावू नये, हे ठरवू. लोढांनी फार लोड घेऊ नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

सुषमा अंधारे म्हणाले, महिलांबाबत प्रचंड असंवेदनशीलतेने विधाने येत आहेत. ती विधान विशेषता भाजप आणि शिंदे गटाकडून येत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्याने घ्यावे कारण त्यांच्या घरात देखील महिला आहेत. 

काय म्हटलं आहे या प्रस्तावात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं.भा.) हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT