Osmanabad District Cooperative Bank Election 2022 News esakal
महाराष्ट्र बातम्या

Osmanabad जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा पराभव, महाविकास आघाडीचे वर्चस्व

महाविकास आघाडीच्या एकोप्याने भाजपचा सुपडा साफ झाला आहे.

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचा दारूण परभाव झाला आहे. महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. अखेरच्या टप्प्यात चुरस वाढल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या एकोप्याने भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपला (BJP) एकही जागा मिळाली नसून काही ठिकाणी उमेदवारच न मिळाल्याने यापूर्वीच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा बिनविरोध निघाल्या होत्या. गेली महिनाभर गाजलेल्या उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा बँकेचा निकाल (Osmanabad District Cooperative Bank Election 2022) सोमवारी (ता.२१) जाहीर झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात कळंब येथील विकास सोसायटी मतदारसंघाचा कल शिवसेनेच्या बाजूने लागला. (Osmanabad District Cooperative Bank Election Mahavikas Aghadi won, BJP Defeated)

बळवंत तांबारे यांनी ४० मते घेत आघाडी घेतली. याच जागेसाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली होती. भाजपचे यंग ब्रिगेड मैदानात उतरल्याने चुरस वाढली होती. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणुकीचा ताबा घेऊन मतदारापर्यंत पोहोचले. त्यामुळे रंगत वाढली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने एकोपा दाखविल्याने भाजपची दाळ शिजली नाही. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या तुरळक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष हाक मतदारांनी ऐकली नाही. आणि कळंब तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला. या शिवाय उस्मानाबाद विकास सोसायटी मतदारसंघातून नानासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २२ मतांनी पराभव केला आहे. इतरही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही.

पाच बिनविरोध

महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्ता मिळविणे आवाहन नव्हते. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत गोटात दुफळीची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे उर्वरीत जागांसाठी काय होते. याकडे सर्वांचे लक्ष होते. ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), मधुकर मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रावण सावंत (शिवसेना), सुनिल चव्हाण (काँग्रेस), बापूराव पाटील (काँग्रेस) यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध वर्चस्व दाखविले होते. मात्र उर्वरीत मतदानासाठी काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस सर्वच जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्याने भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT