Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunratna Sadavarte: पत्रकारांसमोर बायकोला मिठी मारत सदावर्तेंची आव्हाडांवर टीका; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबादः स्वतंत्र मराठवाड्याच्या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते यांनी आज संवाद परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलिसांनी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. या परिषदेनंतर Adv. सदावर्ते यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्र सोडलं.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी खालच्या स्तराला जावून टीका केली. त्यांनी पत्नी जयश्री यांना मिठी मारत ''ओ जितेंद्र आव्हाड अशी स्वतःची बायको स्वतःसोबत ठेवली की विनयभंगाचे आरोप होत नसतात आणि विनयभंगही होत नसतो. खरंखरं प्रेम सोबत ठेवायचं... महिला भगिनींचा आदर ठेवायचा, हे धडे तुम्हाला कुणी देणार नाही, ते मलाच द्यावे लागतील.'' असं सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पुढे बोलतांना सदावर्ते म्हणाले की, अत्याचारी महिलेला जातीबद्दल बोलणं चुकीचं आहे. याबाबत महिला आयोग कारवाई करेल. श्रद्धा प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्वतंत्र मराठवाड्याच्या मुद्द्यावर सदावर्ते म्हणाले की, प्रातिनिधीक स्वरुपातील ही संवाद परिषद यशस्वी झाली आहे. पुढचं पाऊल मुंबईतून आहे. यासाठीचं कार्यालय, न्यायालयीन लाढाई आणि रस्त्यावरील लढाई याबद्दल नियोजन केले जाईल, असं सदावर्ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT