solapur SP atul kulkarni sakal
महाराष्ट्र बातम्या

पारधी समाजातील तरूणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी ‘पहाट’ उपक्रम! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना; नेमका काय आहे ‘पहाट’ उपक्रम, वाचा...

पारधी समाजातील तरूणांना सरकारी नोकरी मिळावी, चांगले शिक्षण घेता यावे, सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढून देणे, यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यासाठी ‘पहाट’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पारधी समाजातील तरूणांना सरकारी नोकरी मिळावी, त्यांना चांगले शिक्षण घेता यावे, सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढून देणे, यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यासाठी ‘पहाट’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांकडील रेकॉर्डनुसार मालाविषयीच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपींचे प्रमाण पारधी समाजातील आहे. ही बाब समजल्यानंतर पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी त्या तरूणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी व दुसऱ्या तरूणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ६) त्यांनी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पारधी बांधवांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. या प्रसंगी एकात्मिक बालविकास आदिवासी प्रकल्पाचे सहायक संचालक श्री. सरतापे, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले. श्री. सरतापे यांनी यावेळी त्यांच्या विभागाकडील आदिवासींच्या योजनांची माहिती दिली.

‘पहाट’ उपक्रम नेमका काय?

  • पारधी समाजातील लोक अनावधानाने रोजीरोटीसाठी गुन्हे करतात, पण त्यात गुन्हा दाखल, अटक, पोलिस कोठडी अशा दुष्टचक्रात अडकतात. त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी विशेष उपक्रम

  • सरकारी नोकरी व योजनांचा लाभ घेण्यासाठी पारधी समाजातील लोकांना आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, जातीचा दाखला, अशी कागदपत्रे मिळावीत म्हणून महसूल विभागाच्या मदतीने त्यांच्या वस्त्यांवर विशेष मोहीम

  • समाजातील शिक्षित तरूणांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून शिकवणी, भरतीपूर्व प्रशिक्षण अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन

  • मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या मदतीने पोलिसांकडून पारधी समाजातील तरूणांना तथा कुटुंबांना मदत केली जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT