pandharpur vitthal temple is a buddhist monastery claim by dr pradip aglave  
महाराष्ट्र बातम्या

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार; डॉ. आगलावेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

देशात सध्या ज्ञानवापी मशिद तसेच कुतुबमिनार या इमारतीवरून नवे वाद सुरु असतानाच महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत मोठा दावा केला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, तसेच हे मंदिर पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.

विठ्ठल मंदिरातील भिंतींवर आजही भगवान बुद्धांच्या मुर्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे, इतकेच नाहीत तर ‘बालाजी मंदीर, जगन्नाथपुरीसह अनेक मंदिरात पूर्वी बौद्ध विहार असल्याचा दावा त्यांनी केलाय, सोबतच ही मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा अशी मागणी बौद्ध अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरूपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती, आमची विहारं पाडून मंदिरं आणि मस्जिद बनवली असा आरोप यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.

“संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केलंय, प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या” असा दावाही डॉ. आगलावे यांनी केला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशि‍दीबाबत देखील असाच वाद सुरू आहे. उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील फास्टट्रॅक कोर्टाकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्या कोर्टाकडे हस्तांतरीत केलं. पण सध्या न्यायाधीश उपलब्ध नसल्यानं या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT