Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : ब्रेक घेणाऱ्या पंकजा मुंडेंचा सगळा रोख फडणवीसांकडे? ''पक्षाने मला दोनदा डावललं''

संतोष कानडे

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आज पंकजा मुंडेंनी असं काहीही नसल्याचं सांगत पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही, असं विधान केलं आहे. पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

''भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे'' असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं स्पष्ट होतंय.

पंकजा मुंडे बोलतांना म्हणाल्या की, सध्याचं जे राजकारण सुरु त्याचा वीट आला आहे. राजकारणातून एक्झिट घ्यायला मी मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे मी एक-दोन महिने सुट्टी घेणार असून अंतर्मुख होऊन विचार करणार आहे. पाठीत खंजीर खुपसण्याच माझं रक्त नाही, २०१९ मध्ये माझा पराभव झाला तेव्हापासून मी पक्ष सोडेल अशा चर्चा सुरु होत्या. चार वर्षांपासून त्या सुरुच आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नाही.

अनेकांना विधानसभा मिळाल्या...

पंकजा मुंडे म्हणाल्या की, भागवत कराडांना राज्यसभा, रमेश कराडांना विधान परिषद मिळाली. त्यानंतरही अनेक विधान परिषद झाल्या. त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करता. माझे अर्थ लावले जातात, अर्थ समर्पकही बसतात. परंतु पुढे काही होत नाही. याबद्दल पक्षाने उत्तर द्यायला हवं. दोन वेळा मला सांगितलं विधान परिषदेसाठी अर्ज भरा आणि दहा मिनिटं आधी सांगितलं की, अर्ज भरु नका, हे कोण करतंय माहिती नाही.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

  • मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी चुकीची आहे

  • एखाद्याची क्रेडिबिलिटी आणि करिअर संपवण्याचा हा प्रकार आहे

  • माझं करिअर कवडीमोलाचं नाही, २० वर्षांपासून मी राजकारणात काम करत आहे

  • माझ्यावर गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत

  • पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाही. त्याचं समर्थन करणंही मला जमत नाही

  • मला डावललं जातं, पंकजा मुंडे पात्र असतील नसतील, यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे

  • अनेकांना विधान परिषद मिळाली, त्यामुळे चर्चा होत आहे

  • भागवत कराड यांच्या रॅलीला मीच झेंडा दाखवला

  • विधान परिषदेसाठी आधी फॉर्म भरा म्हणाले. १० मिनिटं आधी म्हणाले नका भरु

  • पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT