Pankaja Munde Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट

भाजपाकडून उमा खापरे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

वैष्णवी कारंजकर

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहे. यावेळीही पंकजा मुंडेंना हुलकावणी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमा खापरे तसंच श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेतेपदावर असलेले प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद लाड आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभा तसंच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. तर विधान परिषदेवर पाठवायचं की नाही हा निर्णय पक्ष घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होतील.

दरम्यान, भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. पंकजा मुंडेंच्या नावासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोशन भजनकर Bigg bossमध्ये कसा आला? Video पाहून तुम्हीही विदर्भाच्या पठ्ठ्याला सलाम कराल

Mumbai Marathon: आशियाई स्पर्धेसाठी पात्रतेचा निकष कमी हवा; मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर परभणीची धावपटू ज्योती गवते हिचे मत!

Student Endlife : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, व्हिडिओमध्ये म्हणाला- पप्पा मला माफ करा...

Nashik Kalaram Sansthan : काळाराम संस्थानचा ऐतिहासिक निर्णय: दोन टर्मनंतर तिसरी संधी नाही; विश्वस्तांची मक्तेदारी संपणार?

Akola Municipal Election: अकोला मनपा निवडणुकीत भाजप अव्वल; काँग्रेस, वंचितने साधला गेम, राष्ट्रवादी व शिंदेसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

SCROLL FOR NEXT