pankaja munde direct taunt to devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडेंनी टाळलं फडणवीसांचं कौतुक, म्हणाल्या, हे तर काहीच नाही...

संख्याबळावर केलेले काम समाजकारण असते तर संख्याबळ नसताना केलेले ते राजकारण असते

सकाळ डिजिटल टीम

संख्याबळावर केलेले काम समाजकारण असते तर संख्याबळ नसताना केलेले ते राजकारण असते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

सध्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक नाटकीय राज्यमय घडोमोडींमुळे हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही भाजपने बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सुरु आहे. दरम्यान, भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे कौतुक टाळून वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अशाच एका जुन्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. मुंडे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. (pankaja munde direct taunt to devendra fadnavis)

गोपीनाथ मुंडे यांनी एकट्याने सत्ताधारी पक्षाचे १७ सदस्य फोडल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी करून दिली आहे. आता तरी दिल्लीचे पाठबळ असल्याकडे निर्देश करुन तेव्हाच्या तुलनेत सध्याचे काम सोपे असल्याचेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यांसदर्भात त्या म्हणाल्या की, राज्यसभा निवडणुकीनंतर हा निकाल अपेक्षितच होता. यामध्ये विजयी झालेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन करते. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचेही अभिनंदन. कालचा निकाल सर्वांना अपेक्षित होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, संख्याबळावर केलेले काम समाजकारण असते तर संख्याबळ नसताना केलेले ते राजकारण असते. संख्याबळ नसताना इतरही अनेक निवडणुका आम्ही लढवल्या आहोत आणि जिंकल्याही आहेत. त्या जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, तेथे संख्याबळ कमी असूनही आम्ही लढलो आणि जिंकलो आहोत.

मला आठवते की एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी सत्ताधारी पक्षाची १७ मते फोडली होती. तेही एकट्याने. कोणतेही सामर्थ्य पाठीशी नसताना हे काम केले होते. मात्र, आता आमच्या पाठीशी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने मोठे सामर्थ्य उभे आहे. विकासाची दृष्टी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नक्कीच याचा परिणाम होतो आहे, असे मला वाटते. आता या निकालाचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, यावर मी भाष्य करणे योग्य नाही. कारण त्या प्रक्रियेत मी नाही, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT