Pankaja Munde
Pankaja Munde 
महाराष्ट्र

Pankaja Munde: पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत? वैद्यनाथ साखर कारखान्याला आता EPFOची नोटीस

सकाळ ऑनलाईन

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या वैद्यानाथ साखर कारखान्याला पैसे थकवल्याप्रकरणी पुन्हा एक नोटीस आली आहे. यापूर्वी जीएसटी विभागानं याच कारखान्याला नोटीस पाठवली होती. त्यामुळं त्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. यावेळी ईपीएफओनं या कारखान्याला नोटीस पाठली आहे. (Pankaja Munde in trouble again after GST now EPFO send notice to Vaidyanath Sugar Factory)

नेमकं काय घडलं?

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची एकूण ६१ लाख ४७ लाख रुपयांची भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम ईपीएफओ कार्यालयाकडं भरलेली नाही. त्यामुळं या कार्यालयानं कारखान्याला नोटीस पाठवली आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठवाड्यात अनेक सहकारी कारखाने बंद पडले आहेत. त्यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. हा कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे, त्यामुळं तिथं काही मोजकेच लोक काम करत आहेत. (Latest Maharashtra News)

पण या कर्मचाऱ्यांना पगारात जो पीएफ दिला जातो त्याची रक्कम ईपीएफओ कार्यालयाकडं भरण्यात आलेली नाही. त्यामुळं कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर कारखान्यानं स्पष्ट केलंय की ही नेमहीचीच प्रक्रिया आहे. ही रक्कम आम्ही टप्प्याटप्प्यानं भरणार आहोत. (Latest Marathi News)

दरम्यान, यापूर्वी याच वैद्यनात साखर कारखान्याला जीएसटी विभागानं नोटीस पाठवली होती. त्यानंतर ही दुसरी नोटीस आल्यानं कारखान्याची स्थिती बिकट असल्याचंच यातून दिसून येत आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT