महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही; पंंकजा मुंडेंचं मराठा अस्त्र?

पंकजा मुंडे यांनी आता राजकारणासाठी मराठा अस्त्र काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दत्ता लवांडे

बीड : "जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवं करेन" असा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड येथील सभेत बोलताना केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून त्यांनी राजकारणासाठी 'मराठा अस्त्र' उपसलं असल्याचं बोललं जातंय.

"ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं की गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही. पण ते आरक्षण वाचलं आणि ते परत आता कोर्टात अडकलं, पण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही." असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलले आहेत.

"आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदाली झडकावत नाही, मराठा समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल त्यांना शिकवता कसं येईल याचा प्रयत्न सरकार करत आहे. आरक्षण दिलंच पाहिजे पण भावनिक मुद्दा करून काहीच साध्य होणार नाही." असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

"दुधाने तोंड पोळलंय पण आता ताकही फुंकून पिणार"

२०१९ ला आपल्यासोबत धोका झालाय. सर्वसमावेशक चेहरा म्हणून माझ्याकडे बघितलं जातंय. येणारं २०२४ हे इतिहास बदलणारं आणि इतिहास घडवणारं वर्ष असेल असेल पण आता आपल्याला दूध पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे अशी कडवट टीका पंकजा मुंडे यांनी केली.

राजकारणासाठी मराठा अस्त्र?

पंकजा मुंडे यांना स्वपक्ष असलेल्या भाजपकडूनच दुय्यम वागणूक मिळत असून त्यांना पक्षातून डावललं जातंय असं त्यांना बोललं जातं. त्या २०१९ च्या विधानसभा निवडणूक हारल्यानंतर त्यांना पक्षाने डावललं असून येत्या निवडणुकासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचं अस्त्र काढलं आहे अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT