pankaja munde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या खांद्याला दुखापत; आठवड्याभराचे कार्यक्रम रद्द

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे आठवड्याभराचे कार्यक्रम रद्दकरण्यात आलेले आहेत. पुढचा आठवडा त्या उपचार घेणार आहेत. पंकजा मुंडे यांनीच ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचे आठवड्याभराचे कार्यक्रम रद्दकरण्यात आलेले आहेत. पुढचा आठवडा त्या उपचार घेणार आहेत. पंकजा मुंडे यांनीच ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

पंकजा मुंडेंचं ट्वीट

''माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा उपचार घ्यावे लागतील. त्यामुळे माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे. प्रवास करण्याची परवानगी नाही.'' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे ह्या बीडच्या माजलगाव येथे लग्नसमारंभासाठी उपस्थित राहिल्या होत्या. तिथे त्यांची मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. दोघांमध्ये चर्चादेखील झाली होती. माजी मंत्री राजेश टोपे यांचीही लग्नसमारंभाला उपस्थिती होती.

त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पंकजा यांनी ट्वीट करत दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय झालेल्या आहेत. विशेष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात सुरु आहे. तरीही त्यांनी कुठल्याच ओबीसी मेळाव्यात किंवा बैठकीसाठी उपस्थिती लावलेली नाही. उलट त्यांची विधानं ही मराठ्यांच्या बाजूने येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Drug Inspector Exam Paper Leak : नीट नंतर आता MPSC चाही पेपर फुटला? औषध निरीक्षक भरती वादाच्या भोवऱ्यात, विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप

आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज करा असं नाही; पोलीस कारवाईवरून सरन्यायाधीशांनी सुनावलं, दिले शिस्तीचे धडे

Latest Marathi News Live Update : 'विद्यार्थ्यांच्या हिताचे विधेयक भरकटवू नका'; काँग्रेसला किरेन रिजिजू यांचे आवाहन

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी २० कोटींचं पॅकेज? CSK ने दोन खेळाडूंच्या अदलाबदलीसह Mumbai Indiansला दिली भारी ऑफर

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! महालक्ष्मी येथे स्वयंचलित पादचारी पूल खुला होणार, २० मिनिटांचं अंतर कमी होणार

SCROLL FOR NEXT