Devendra Fadnavis Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : 'दारुवाली बाई'वरुन झालेल्या टीकेवर पंकजा मुंडे बोलल्या; म्हणाल्या फडणवीस...

संतोष कानडे

मुंबईः मागे एकदा पंकजा मुंडे यांच्यावर 'दारुवाली बाई' असं म्हणत टीका करण्यात आली होती. त्याच मुद्द्यावरुन आज पंकजा मुंडे यांनी आज भाष्य केलं आहे.

भाजप स्थापना दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

परवा उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'फडतूस' शब्द वापरुन टीका केली होती. त्याचसंबंधी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला. त्या 'टीव्ही९'शी बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात आल्यानंतर माझ्यावरदेखील टीका-टिपण्णी केली केली. माझा डिस्टिलरी प्लांट असल्याने माझ्यावर दारुवाली बाई अशी टीका करण्यात आलेली होती. एवढंच नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर खालच्या स्तरावर जावून टीका केली गेली.

'रेल्वे स्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले, मला ट्रोल करण्यात आलं, माझा अपमान झाला तरीही मी डगमगले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका होतेय. त्यामुळे ते व्यथित होतील, असं वाटत नाही.'

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणाचा रस्ता काटेरी आहे. सिंहासनदेखील काटेरी आणि मुकूटही काटेरी आहे. त्यामुळे टीका टिपण्णी होतच असते आणि होतच राहणार आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांचं काम व्यवस्थित करतील, यात शंका नाही.

भाजप स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. माध्यमाशी बोलतांना त्यांना दारुवाली बाई या टीकेची आठवण सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT