Chandrakant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

'...म्हणूनच न्यायालयाने महाविकास आघाडी विरोधात निकाल सुनावले'

विरोधात निकाल येत असल्याने न्यायव्यवस्थेवर संशय -चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

न्यायालयाचे निकाल हे महाविकास आघाडीच्या (MahaVikas aghadi) विरोधात येत असल्याने ते न्यायव्यवस्थेवर संशय उपस्थित करत आहेत. मुळात प्रत्येक केसमध्ये योग्य ती माहिती आणि पुरावे मिळाल्याने न्यायालयाने महाविकास आघाडी विरोधात निकाल सुनावला आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय काल सुप्रिम कोर्टाने दिला आहे. काल भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत टीका केली होती. आज पुन्हा त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी विरोधात निकाल सुनावल्यामुळे त्यांनी भाजपवर संशय घ्यायला सुरुवात केली आहे असेही ते म्हणाले.

आधी चुका करायच्या आणि नंतर त्या मान्य करायच्या नाहीत अशी आघाडीची वृत्ती.

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणातही कोर्टाने साबीआयकडे केस दिली आहे. नवाब मलिक प्रकरणातही कोर्टाला काही पुरावे सापडले. त्यांनी निर्णय सुनावला. पण कोर्ट देखील भाजपचे म्हणण मांडतय असे आघाडी सरकार आरोप करते. आधी चुका करायच्या आणि नंतर त्या मान्य करायच्या नाहीत अशी आघाडीची वृत्ती आहे असा टोला आघाडीला लगावला.

जहाज बुडण्याच्या भीतीनं उंदीर सैरावैरा धावू लागले

राज्यातल्या मविआ सरकारवर चहूबाजूंनी संकंट येत आहेत. ED आणि अन्य केंद्रीय यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करून यांना काही साध्य झालं नाही. आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मागणीनुसार त्यांच्यावरील खटल्यांचा तपास CBI ने करावा असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलायं किती ही नाचक्की! कोर्टात जाऊन थपडा खायच्या, नाचक्की करून घ्यायची ही सरकारची आता सवयच झालेली आहे. सत्तेसाठी केलेल्या तडजोडींचं फळ आता शिवसेनेला भोगावं लागणार आहे. अर्थात, परमबीर सिंगांच्या CBI चौकशीमुळे जहाज बुडण्याच्या भीतीनं बरेच उंदीर सैरावैरा धावू लागले, तरी आश्चर्य वाटायला नको! अशी टीका काल चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT