ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांना महागाईचा दणका; वही २५ टक्क्यांनी तर पेनांच्या दरात २० टक्क्याची वाढ New academic year

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळ्या खरेदीला वेग येईल. पण वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावरही होत आहे. वह्या, पुस्तके खरेदी करायला जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वह्या आणि पेनच्या दरात २० ते २५ टक्यांनी वाढ झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत नोटबुकच्या दरामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यापाठोपाठ पेन व शाईच्या दरातही १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पूर्वी १०० पेजेसचे नोटबुक २० रुपयांचे होते. तेच आता वाढून २५ रुपयांचे झाले आहे. तीन रुपयांचे मिळणारे पेन ५ ते ६ रुपयांचे झाले. दप्तर, वॅाटर बॅाटल्स व प्रवासही महागला आहे. ही २५ टक्के स्पष्ट वाढ पालकांच्या डोक्याला ताप होणार हे नक्की. यामुळे सामान्य कुटुंबातील पालक आणि विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.

दरवर्षी शालेय साहित्याच्या किमतीमध्ये ६ ते १० टक्क्यांची वाढ अपेक्षित असते. परंतु यंदा ही वाढ मोठी आहे. बालभारतीच्या पुस्तकांच्या किमती कायम असल्याने पालंकाना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु स्पर्धापरिक्षांच्या पुस्तकांमध्ये आठ ते दहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

अशी झाली वाढ

नोटबुक २५ टक्के

पेन १५ ते २० टक्के

शाई १० टक्के

गणवेश २० टक्के

दप्तर १५ ते २० टक्के

भाज्या, गॅस, तेल व कडधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात आता मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या किमतीदेखील वाढल्याने घरखर्चावर अधिक ताण वाढला आहे. वह्या व इतर वस्तूंचे दर वाढले असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी खरेदी करावीच लागणार आहे. यामुळे चालू महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

- नीलिमा जोगी, गृहिणी.

कागद बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे वह्यांच्या किमती वाढल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वह्या, नोटबुकच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पेन, शाईच्या दरातही वाढ झाली आहे.

- जयंत घारपुरे, विक्रेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Sindhudurg Rain Alert : सिंधुदुर्गात वरुणराजाचा हाहाकार! 'ऑरेंज अलर्ट'मुळे पूरस्थिती निर्माण होणार? NDRF चं पथक दाखल, समुद्रही खवळला, किनाऱ्याला धडकताहेत अजस्र लाटा

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Pune News : सावरकरांच्या सुटकेसाठी काँग्रेसने केला होता ठराव; सात्यकी सावरकरांची न्यायालयात माहिती, सात जुलैला होणार उलटतपासणी

जय भीम चित्रपटाची पुनरावृत्ती? राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेप, काय आहे बेग्या पवार प्रकरण?

SCROLL FOR NEXT