Om Birla Speaker of the LokSabha esakal
महाराष्ट्र बातम्या

Parliament Security Breach : ''सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही, आम्ही ते होऊ देणार नाही'' लोकसभा अध्यक्ष संतापले

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये बुधवारी मोठी चूक झाली. दोन तरुणांनी सभागृहातील गॅलरीतून थेट सभागृहात उड्या घेतल्या होत्या...

संतोष कानडे

Winter Session 2023 : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये बुधवारी मोठी चूक झाली. दोन तरुणांनी सभागृहातील गॅलरीतून थेट सभागृहात उड्या घेतल्या. त्यांच्या बुटामध्ये स्मोक कॅन होत्या. त्यांनी त्या फोडून रंगीत धूर सोडला. या कृतीमुळे सगळेच आवाक् झाले. संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवरुन गुरुवारी विरोधकांनी गदारोळ केला.

लोकसभेमध्ये घोषणाबाजी आणि गदारोळामुळे विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं होतं. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांनी अराजकता पसरवू नये, अशी तंबी दिली.

बिर्ला म्हणाले की, काल जी घटना घडली, त्याची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे. लोकसभा अध्यक्षाच्या नात्याने ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी याबाबत आपल्यासोबत बसून चर्चा करेन. कालही मी चर्चा केलेली आहे, आज पुन्हा चर्चा करु. याबाबतीत सरकारचं काहीही देणं-घेणं नाहीये. सरकार सचिवालयाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही आणि आम्हीही तसं करु देत नाही.

संसदेच्या सुरक्षेवरुन बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, कालच्या घटनेचा सगळ्यांनीच निषेध नोंदवलेला आहे. लोकसभा अध्यक्षांनी तातडीने तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्या सगळ्या सदस्यांना खबरदारी घेणं गरजेचं आहे की आपण अशा लोकांना पास दिला नाही पाहिजे.

भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली गेली पाहिजे. आता संसदेत गोंधळ घालून काहीही उपयोग नाही, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी विरोधकांना केलं.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या घुसखोरीचं कारण समोर आलेलं आहे. सर्व हल्लेखोर बेरोजगार आहेत आणि नोकरी न मिळाल्याने ते त्रस्त होते, अशी प्राथमिक माहिती आहे. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निवदेन करणार आहेत. हे चौघे तरुण नेमक्या कोणत्या कारणाने संसदेत घुसले होते, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का? याबाबत सभागृहात खुलासा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

INDU19 vs AUSU19 : ५-०! जे सिनियर्सना नाही जमलं, ते ज्युनियर्सनी करून दाखवलं; ऑस्ट्रेलियाला घरात घुसून लोळवलं

Maratha Reservation : 1994 च्या 'जीआर'ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार; मनोज जरांगेंचा महत्त्वाचा निर्णय, ओबीसी नेत्यांसह काँग्रेसला दिला इशारा

Cough Syrup for Children: कफ सिरपमध्ये नेमकं काय? रिनल बायोप्सीतून समोर आलं मुलांच्या मृत्यूचे कारण

SCROLL FOR NEXT