‘ग्लोबल महाराष्ट्र’मध्ये ४०० शाळांचा सहभाग  sakal
महाराष्ट्र बातम्या

‘ग्लोबल महाराष्ट्र’मध्ये ४०० शाळांचा सहभाग

जर्मनीतील भारतीय दूतावासाचा पुढाकार; सकाळ माध्यम समूहाचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून जर्मनीत राहणाऱ्या मराठी नागरिकांनी हाती घेतलेल्या ‘ग्लोबल महाराष्ट्र’ या उपक्रमात महाराष्टातील शाळा जोडणे व मार्गदर्शनपर उपक्रमात राज्यातील ४०० हून अधिक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त म्युनिक (जर्मनी) येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करीत हा उपक्रम राबविला. जर्मनीमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील मराठी अधिकारी डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. चव्हाण हे मूळचे नांदेडचे आहेत. यावेळी भारतीय वाणिज्य दूतावासाचे मोहित यादव, खासदार प्रियांका चतुर्वेदी, ‘सकाळ’चे संपादक- संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, जर्मनीतील महाराष्ट्र मंडळाचे प्रमुख अभिजित माने, सदस्य प्रीती राव, दुर्गा खटखटे, केदार जाधव, ऋतुजा शेट्ये यांच्यासह राज्यातील ४०० हून अधिक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोहित यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक करत राज्यातील विद्यार्थ्यांना एक मोठी संधी निर्माण होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. ‘पुढील काळात पर्यावरण, पर्यटन, उद्योग या क्षेत्रांतही हा उपक्रम राबविल्यास मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. या उप्रकमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ. सुयश चव्हाण यांनी ‘सकाळ’चे अभिनंदन केले. यापुढील काळात हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘माय मराठी शाळा’

जर्मनीतील मराठी कुटुंब नेहमीच एकत्र येत सण व उत्सव साजरे करीत असल्याचे सांगून महाराष्ट्र मंडळातर्फे मराठी ग्रंथालय, जर्मनीत नव्याने येणाऱ्या मराठी व्यक्तीस मार्गदर्शन, स्थानिक लोकांसाठी दिवाळी अंक आदी उपक्रम सुरु केल्याचे प्रीती राव यांनी सांगितले. जर्मनीत सुरु करण्यात आलेल्या ‘माय मराठी शाळा’ या योजनेची माहिती दुर्गा खटखटे यांनी दिली. यावेळी ऋतुजा शेट्ये यांनी जर्मनीतील शिक्षणातील त्यांचे अनुभव सांगितले. केदार जाधव जर्मन भाषा व शिक्षणातील नवीन संधींबदल माहिती देत यापुढील काळात जर्मनीत कुशल मनुष्यबळाची गरज असून उच्च शिक्षणासाठी मोफत व उत्तम दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार लवकरच बाबा आढाव यांची भेट घेणार!

जगभरात धुमाकूळ घालणारी रशियन दारू का आहे फेव्हरेट? किंमत ऐकून बसेल धक्का...

Kolhapur TET Oppose : टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा प्रचंड आक्रोश; शाळा बंद ठेवत हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी अडकला लग्नबंधनात; थाटात पार पडला विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT