Patra chawl scam case ed Summons Swapna Patkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स

संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं आज स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

धनश्री ओतारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं आज स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावलं आहे. त्यांनी ईडीनें आज चौकशीसाठी बोलावलं आहे. . याच प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली असताना ईडीनं स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.(Patra chawl scam case ed Summons Swapna Patkar)

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. यापूर्वीही ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता. आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांचीही ईडीनं चौकशी केली होती. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT