Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मोठा दिलासा

संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज सादर केला

धनश्री ओतारी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. (Patra Chawl Scam case Sanjay Raut )

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जमीनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर आज (10 मे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर राहिले.

गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप स्पष्ट नाही. सारंग आणि राकेश वाधवान यांना कोर्टात हजर करण्यासाठी ईडीनं जेल प्रशासनाला विनंती केल्याची ईडीच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली.

पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT