Winter Session News, Political News esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News: नेटकरी म्हणतात, फडणवीसांच्या शाळेत पवार हेडमास्तर; एका दगडात ४ पक्षी जाळ्यात

आज आधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे

रुपेश नामदास

Winter Session: राज्य सरकारचं हिवाळी आधिवेशन चालू आहे आणि आज आधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच जुंपल्याचे पाहिला मिळाले मात्र, हे अधिवेशन गाजलं ते शिंदे गटातील मंत्र्यांवर झालेल्या आरोपांनी आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच नागपूर न्यास घोटाळ्याचे आरोप झाले.(Political News)

त्यामुळे आधिवेशन चांगलचं तापलं मात्र हे चालू असताना चर्चा मात्र शरद पवारांची जास्त झाली. त्याला कारण ही तसच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडून मंत्री राहिलेले, आणि शिंदे-भाजपमध्ये देखील मंत्री असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. दम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे-भाजप सरकार मधील मंत्र्यांवर काय आहेत आरोप जाणून घ्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप होतायत तो 'नागपूर न्यास घोटाळा' काय आहे?

एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री म्हणून शिंदे यांनी 5 एकर सरकारी जमीन 16 बिल्डर्संना कमी दरात भाडेतत्वावर दिली होती. ही जमीन झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधण्यासाठी होती.

मात्र, ती काही खासगी विकासकांना देण्यात आल्याचे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. या जमिनीची मालिकी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (NIT)कडे आहे. दरम्यान या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे की, बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत ही 83 कोटींहून अधिक होते.

मात्र, ती 2 कोटींहून कमी किंमतीला 16 जणांना भाडेतत्वावर देण्यात आली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एनआयटीला खडे बोल सुनावले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 4 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

त्यामुळे तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याने विरोधक यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अब्दुल सत्तारांवर आरोप होतायत तो घोटाळा काय आहे?

वाशिम येथील कथित जमीन घोटाळा प्रकरण आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अधिवेशनामध्ये आक्रमक होत अजित पवार यांनी सत्तार यांना धारेवर धरले.

कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करुन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी पवार यांनी केली.

दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) घोटाळा प्रकरणात माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नावं समोर आले आहे.

यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली होती. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणाक टीका झाल्या.

हेही वाचा-जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

संजय राठोड यांच्यावर आरोप होतायत तो घोटाळा काय आहे?

कृषीमंत्री अद्बुल सत्तार जमीन घोटाळाच्या वादात असतानाच आता आणखी एका नेत्याचे नाव समोर आले आहे. सत्तारांपाठोपाठ अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडदेखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

संजय राठोड हे मविआ सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी २९ जुलै २०१९ रोजी गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे झाली होती. सावरगाव (ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) येथील गायरान जमिनीचे हे प्रकरण आहे.

उदय सामंत यांच्यावर आरोप होतायत तो घोटाळा काय आहे?

टिळक नगर इंडस्ट्रीजला २१० कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आरोप करण्यात आला आहे की एक प्रकल्प अहमदनगर, तर दुसरा प्रकल्प ३५० किलोमीटर लांब असलेल्या रत्नागिरी येथे आहे.

मात्र दोन्ही कंपन्या मिळून एक कंपनी दाखवून या कंपनीला २१० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आधिवेशनात चांगलेच पडसाद उमटले.

मात्रा राजकीय वर्तुळात शरद पवार यांची चर्चा झाली. सांगितल जात आहे की मविआ सरकारमधील मंत्र्यांना फडणवीस हे भ्रष्टाचारांच्या आरोपांवर कोंडीत पकडत होते. एखाद्या मंत्र्यावर जर घोटाळ्याचे आरोप झाले तर त्याच्या राजीनामा किंवा चौकशी होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यास भाग पाडत. तीच योजना शरद पवार यांनी आपल्या मित्र पक्षांना आणि राष्ट्रवादीला आखण्यास सांगितली त्यांमुळे हे आधिवेशन चांगलेच गाजले असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT