0corona_498.jpg
0corona_498.jpg 
महाराष्ट्र

पेन्डिंग 427 रिपोर्टने वाढविली चिंता ! सोलापूर ग्रामीण कोरोनाचा हाहाकार, आज 153 नवे रुग्ण; शहरात 39 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता कोरोना या विषाणूने जिल्ह्यातही चांगला जम बसवायला सुरुवात केली आहे. मंगळवारपर्यंत (ता. 14) जिल्ह्यात 960 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. बुधवार त्यात 153 रुग्णांची भर पडली असून आता ग्रामीणमधील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 113 झाली आहे. तर शहरात 39 रुग्णांची संख्या भर पडली असून शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 384 झाली आहे. दुसरीकडे शहरातील मृतांची संख्या 310 तर ग्रामीणमधील मृतांची संख्या 41 झाली आहे. 

ग्रामीणमध्ये 'या' ठिकाणी आढळले नवे रुग्ण 
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कारंबा, नान्नज, मार्डी, हिरज, हगलूर, कोंडी, करमाळ्यातील जवळेकर हॉस्पिटलजवळील स्टाफ कॉर्टर्स, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, मंगळवेढ्यातील किल्ला बाग, निंबोनी, माढ्यातील कुर्डूवाडी, भोसरे, रिधोरे, बार्शीतील भवानी पेठ, खुर्पे बोळ, किराना रोड, मल्लप्पा धनशेट्‌टी रोड, मांगाडे चाळ, पवार प्लॉट, शिवाजी नगर, सुभाष नगर, भालगाव, दहिटणे, हाळदुगे, सासुरे, उंडेगाव, वैराग तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगर, बुधवार पेठ, दत्त नगर, कोष्टी गल्ली, साठे नगर, भांबेवाडी, कोरवली, सोहाळे येथे नवे रुग्ण सापडले आहेत. तर पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, अनिल नगर, बागवान गल्ली, भगवान नगर, ज्ञानेश्‍वर नगर, गांधी रोड, घोंगडे वस्ती, लिंक रोड, रोहिदास चौक, संत पेठ, गोपाळपूर, करकंब, लक्ष्मी टाकळी, पुळूज, वाखरी, व्होळे येथे दर दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी, बरुर, भंडारकवठे, बोरामणी, दोड्डी तांडा, कंदलगाव, मुळेगाव तांडा, विंचूर, येळेगाव येथे आणि अक्‍कलकोट तालुक्‍यातील अरब गल्ली, भारत गल्ली, बुधवार पेठ, खासबाग, मधला मारुती, माणिक पेठ, न्यू पॅलेस रोड, मैंदर्गी, चुंगी, तडवळ, उल्हास नगर, किणी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. हगलूर आणि भंडारकवठे येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. 


शहरात 'येथे' सापडले नवे रुग्ण 
विद्यानगर सोसायटी (उत्तर सदर बझार), रोहिणी नगर (सैफूल), लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), कर्णिक नगर, सर्वोदय नगर (मुळेगाव रोड), नंदिमठ बोळ (शुक्रवार पेठ), उत्तर सदर बझार, महात्मा फुले वस्ती (मोदी), आशियाना नगर (जुळे सोलापूर), गरिबी हटाव झोपडपट्टी, प्रतापनगर (विजयपूर रोड), दत्तनगर (न्यू तुळजापूर नाका), अवंतीनगर (जुना पुना नाका), वानकर वस्ती (देगाव रोड), जम्मा वस्ती, धोत्रीकर वस्ती (भवानी पेठ), राधाकृष्ण अपार्टमेंट (उत्तर कसबा), साधुवासवानी बागेजवळ (गुरुनानक चौक), सोनिया नगर (विडी घरकूल), आंबेडकर हौसिंग सोसायटी (अंत्रोळीकर नगर), विकास नगर, काडादी नगर (होटगी रोड), सेटलमेंट कॉलनी क्र. एक, पुनित अपार्टमेंट (रेल्वे लाईन), उत्तर कसबा आणि विजयालक्ष्मी नगर (नई जिंदगी) येथे आज नवे 39 रुग्ण सापडले. 


तालुकानिहाय रुग्णसंख्या 

  • अक्‍कलकोट : 189 
  • बार्शी : 236 
  • करमाळा : 14 
  • माढा : 34 
  • माळशिरस : 17 
  • मंगळेवढा : 8 
  • मोहोळ : 79 
  • उत्तर सोलापूर : 111 
  • पंढरपूर : 81 
  • सांगोला : 6 
  • दक्षिण सोलापूर : 338 
  • एकूण : 1,113  
     
  • ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमध्ये आज (बुधवारी) सापडले 153 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
  • ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या आता एक हजार 113; मृतांची संख्या 41 झाली 
  • दक्षिण सोलापुरातील रुग्णसंख्या 338, उत्तर सोलापूर 111, बार्शीत 236 तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 189 रुग्ण 
  • दक्षिण सोलापूर हॉटस्पॉट, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, पंढरपूरही कोरोनाच्या हिटलिस्टवर 
  • ग्रामीणमध्ये आज दोघांचा तर शहरातील एका रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • शहरात आज सापडले 39 रुग्ण अन्‌ दोघांचा मृत्यू 
  • शहरातील 331 तर ग्रामीणमधील 96 संशयितांचे अहवाल प्रलंबित 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT