fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

नवरात्रीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळणार? फडणवीसांचे संकेत

राज्यात नवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात नवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यासाठी सुरुवातीचे दोन दिवस बारे वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण उर्वरित दिवसांसाठी देखील ही मुदत वाढवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (Permission may be given till midnight for Navratri Programmes HM Fadnavis gives positive signal)

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "नवरात्रीत दोन दिवस आम्ही बारा वाजेपर्यंत परवागनी दिली आहे. त्यानंतर एक दिवस वाढला पाहिजे असा प्रस्ताव आम्ही गृहमंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहोत, त्यावर अंतिम निर्णय मख्यंमत्री घेतील"

राज्यात आजपासून नवरात्रीला सुरु झाली आहे. पुढील नऊ दिवस जनतेमध्ये याचा उत्साह असेल दरम्यान, पुजाअर्चेसह गरबा-दांडिया अशा विविध कार्यक्रमाचं या नऊ दिवसांमध्ये आयोजन केलं जातं. प्रामुख्यानं रात्रीच्या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमांना सुरुवातीचे दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

पण पुढील दिवसांपर्यंतही रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या मागणीवर सकारात्मक विचार करुन परवानगीबाबत विचार करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT