Raj Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज यांच्या सभेविरुद्ध दाखल याचिका न्यायालयाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड

राज ठाकरे यांची सभा रद्द करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा होणार आहे. मात्र सभेपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी (ता.२८) अखेर पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सभेला परवागनी दिली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा रद्द करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने ती फेटाळली आहे. ही याचिका राजकीय हेतून प्रेरित असल्याचे न्यायालयाने म्हणत याचिकाकर्त्याला १ लाखाचा दंड ठोठावला आहे. (Petition Against Raj Thackeray Sabha Dismissed By Aurangabad Bench)

राज ठाकरे यांची सभा होऊ नये. त्यास मनाई हुकुम द्यावी या मागणीची याचिका रिपब्लिकन युवा मोर्चाने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सदरील याचिकेच्या सुनावणी वेळी पोलिस आयुक्तांच्या आदेश न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यावेळी सभेविषयी पोलिस आयुक्तांनी सर्व काळजी घेतली असल्याचेही न्यायालयाला सरकारी वकिलांनी सांगितले.

नंतर सदरील याचिका राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला १ लाखाचा दंड ठोठावत याचिका फेटाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT